संत मायबाप ऐका माझी हाक

संत मायबाप ! ऐका माझी हांक ।
घाला एक भीक दीनरंका ||धृ ||
द्या मज दावोनी पंढरीचा राणा । 
आलो मी चरणा आपूलिया ||1||
अज्ञान मी पोर कळेना मजसी । 
घ्याहो पदरासी आपुलिया ||2||
तुकड्यादास म्हणे तुमचिया कृपे । 
मार्ग होती सोपे पंढरीचे ||3||