ऐसा कारे देवा निष्ठुर तू होसी
ऐसा कां रे देवा ! निष्ठूर तू होसी ? ।
दया ना तुजसी बेई माझी ॥
काय तुझा तुज आहे अहंकार ? ।
जरा ना बाहेर पाय देसी ॥
काय तुज आम्ही नेऊ पळोनिया ? ।
अमृत चाखाया नेदू तुज ? ॥
तुकड्यादास म्हणे सोड हा संदेह ।
लावू दे हा स्नेह पायापाशी ॥