कठीण हा भव वर्णियला संती

कठीण हा भव वर्णियला संतीं । 
तेथे पाझी मती किती सांगा ? ॥
जयाने पाडिले थोर पर्वतासी । 
आम्ही काय त्यासी झाडे झुड़े ॥
विश्वामित्रासम तपी शक्तिपान । 
तयावरी ताण कामे केली ॥
तुकड्यादास म्हणे आमुच्याने नव्हे । 
गुरुकृपे दिवे प्रकाशती ||