येतो देव घरी मज भास झाला
येतो देव घरी मज भास झाला ।
परि दुर्गुणाला काय करू ? ॥
कैसे काढू यासी जाईना लौकरी ।
देव तरी घरी कैसा येई ? ॥
मार्ग झाले बंद देवा यावयासी ।
काय हे कोणासी म्हणू आता ? ।।
तुकड्यादास म्हणे देव तो ठायीच ।
पाप-कर्म साच आड़ येते ।॥