का न भेटू देती हे वैरी आडवे

 का न भेटू देती है वैरी आडवे ? । 
ऐसे कां केशवे केले याना ? ॥
दार झाले बंद कोणी लावियले ? । 
आम्हा  अंतरले नारायण ।
कोण सांगे मार्ग कोणा शरण जाऊ? । 
कासयाने पाहू देवा माझ्या?
तुकड्यादास म्हणे कृपा करा दीना । 
भेटवा  नयना सखा माझा ।