संसार सर्व हा आहे मुशाफिरी
संसार सर्व हा आहे मुशाफरी ।
एक नाही येरी टिको आला ||धृ ||
आले गेले किती नाही यावी मिती ।
बेरजेच्या रीती नष्ट झाल्या ||1||
काके मामे आजे पाहताचि मेले ।
छाती नाही नेले कोणी धना ||2||
तुकड्यादास म्हणे आपणाहि जाणे ।
कासया फसणे थोड्या वेळा ? ||3||