सावधान रहा आठवा गोविंदा
सावधान रहा आठवा गोविंदा ।
लागू नका छंदा वासनेच्या ||धृ ||
नाशिवंत देह सोडिला एकदा ।
आणील आपदा गर्भवासी ||1||
करिता दुष्कृत सुख वाटे मना ।
होतील यातना कळे तेव्हा ||2||
तुकड्यादास म्हणे केले ते पावाल ।
अंतकाळी हाल दिसो येती ||3||