चुकेना कल्पांती केलिया कर्मासी

चुकेना कल्पांती केलिया कर्मासी । 
यम हा चौकसी नेटे करी ||धृ ||
चित्रगुप्ता हाती राहतो रिपोर्ट । 
जरा नाही खोट त्यांच्या लेखी ||1||
अंधारी उजेडी सर्व त्यांना कळे । 
साक्षदार बळे चित्तबुद्धि ||2||
तुकड्यादास म्हणे दया नये यमा ।
झालिया त्या कर्मा भोग पावे ||3||