करा काहीतरी उठा रे जागुनी
करा काहीतरी उठारे जागुनी ।
जातो क्षण क्षणी वेळ व्यर्थ ||धृ ||
चित्रगुप्त करी टिपण आपुले ।
काय याने केते जगामाजी ||1||
पुसतील जेव्हा यमाचिये द्वारी ।
दयावया उत्तरे जपा काही ||2||
तुकड्यादास म्हणे व्हा झणीं सावध ।
चुकवा हे बंध वासनेचे ||3||