सावधान रहा विसरू नये कधी

सावधान रहा विसरू नये कधी । 
आयुष्याची संधी पुन्हा नये ||धृ ||
काय करावे ते याच् जन्मी होते । 
गेलिया मागुते दुःखी व्हाल ||1||
दया नाही जरा यमाचिये चित्ती । 
कोण जन्म होती कैसे सांगो ? ||2||
तुकङ्यादास म्हणे मृत्यु ठेवा डोळी । 
भजा वंनमाळी अहोरात्री  ? ||3||