उद्या करायचे आज करा काही
उद्या करायाचे आज करा कांही ।
भरवसाचि नाही आयुष्याचा ||धृ ||
देह हा कांचेच्या नळिये सारखा ।
कधी खाय धोका नेम नाही ||1||
आज करायाचे आताचि कराना ।
भावे का भजाना पांडुरंग ||2||
तुकड्यादास म्हणे लागा चिंतनासी ।
आठवा मानसी प्रभू पाझा ||3||