जो नम्र होऊ नेणे ! तेणे बुडविले जिने

जो नम्र  होऊ नेणे । तेणे बुडविले जिणे ||
जया देह-अभिमान । 
तया यातना कठीण ||
जया शांति नाही पोटी । 
तया परमार्थाची तुटी ॥
तुकड्यादास म्हणे ।
 जाणती हे ते शहाणे ॥