राम नामाचा महिमा

राम-नामाचा महिमा । 
संत जाणताती सीमा ||धृ ||
नामे तारिले पाषाण । 
नामे उद्धारिले जन ||1||
वाल्या कोळी ऋ्षि झाला। 
बहुत सामर्थ्यी वाढला ||2||
तुकड्यादास म्हणे नाम । 
देई अंती निज-धाम ||3||