गारे गारे हरीनाम

 गारे गारे हरीनाम । 
विना मोलाचे सुगम ||धृ ||
कवड़ी रुका नलगे कांही । 
कष्टावीण फळ देई ||1||
श्रद्धा भक्ति धरा पोटी । 
कृपा करी जगजेठी ||2||
तुकड्यादास म्हणे उठा । 
देव पहातसे वाटा ||3||