जया मुखी नाम पावन तो देह
जया मुखी नाम पावन तो देह ।
सकळ संदेह नाशियले ||धृ ||
तो एक पावन दुजियासि तारी ।
ज्यासी कृपा करी तोचि धन्य ||1||
होता त्याची वाणी होय थोर ।
येरही किंकर तारी वाचे ||2||
तुकड्यादास म्हणे बीज तैसे फळ ।
ऐसे आहे बळ संती केले ||3||