तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आता सांभाळाया आम्हा तुजविण कोण रामा
आता सांभाळाया आम्हा ।
तुजविण कोण रामा ! ||धृ ||
धरा हाती धनुष्यबाण ।
वळवा माझे दुष्ट मन ||1||
तोड़ा विषयांची संगती ।
लावा सज्जनांच्या पंथी ||2||
तुकड्यादास म्हणे आणा ।
मना माझी ही प्रार्थना ||3||