आम्ही भजो मनःप्राणें

आम्ही भजो मनप्राणे । 
परी न चुको आमुच्याने ||धृ ||
कोठवरी आवरावे ।
 मन दाही दिशा धावे ||1||
देवा ! कराना हो दया । 
तोड़ा आपुली ही माया ||2||
तुकड्या म्हणे मी चिडलो । 
साधनाने या त्रासलो ||3||