चित्त राहो समाधान ! तुझे करावया ध्यान

 चित्त राहो समाधान ।
तुझे करावया ध्यान ||धृ ||
ऐसी सद्बुध्दी द्या देवा! ।
घ्याहो करुणा ही केशवा ! ||1||
मन जरा शांत  नाही । 
फिरे वासना विषयी ||2||
तुकड्यासी दावा वाट । 
वृत्ती वाटते उद्धट  ||3||