तूच माझा सरदार ! सखा मित्र सावकार

 तूच माझा सरदार । 
सखा मित्र सावकार ||धृ ||
तुझ्याविणा आम्हा नाही । 
जगी त्रैलोकी सर्वही ||1||
काय घडेल ते घडो । 
सेवा करिता देह पडो ||2||
तुकड्या म्हणे हीच आस । 
मिठी घातली पायास ||3||