तूचि आठविशी तरि घे मी नाम । नाही तरी प्रेम कैचे आम्हा ?
तूचि आठविशी तरि घे मी नाम ।
नाही तरी प्रेम कैचे आम्हा ? ||धृ ||
तुझ्या सत्तेवीण वृक्षबल्ली तेही ।
न हालती, ग्वाही संत देती ||1||
तरी मी पापर काय तुज गाऊ ।
कैसियाने राहू समाधान ? ||2||
तुकङ्यादास म्हणे तुम्ही कृपा करा ।
तरिंच लागे थारा परमार्थाचा ||3||