सांगा तरी आम्हा काय हे न करू
सांगा तरी आम्हा काय हे न करू ।
काय धरू हरू कोणते ते ? ||धृ ||
मी तो हा अज्ञान लेकुराची जात ।
कळेना रमस्त काय होई ? ||1||
हौसी जीव सदा करी हाय हाय ।
व्यर्थ सर्व जाय दैव- वादें ||2||
तुकड़्यादास म्हणे बोल देवा ! मशीं ।
लागू या सेवेसी कैसा तुझ्या? ||3||