जाति हीन पाझी, मति हीन माझी
जाति हीन पाझी, मति हीन माझी ।
ज्ञान ध्यान तुझी पूजा नेणो ||धृ ||
नाही आचरलो शुद्ध कर्म अंगी ।
वाढलो ||1||
द्रव्यहीन पुरा दान ना घडले ।
आयुष्य हे गेले व्यर्थ माझे ||2||
तुकड्यादास म्हणे आहे हीन मूढ़ ।
भवांतूनि काढ देवराया ||3||