सुगम साधन नाम हरी-कथा
सुगम साधन नाम हरी-कथा ।
गोड ही अमृताहुनी देवा ||धृ ||
कलियुगी हेचि वर्णियली संतीं ।
नामाची महती पदोपदी ||1||
अनुभवा आले नामाचे महिमान ।
तारिले पाषाण येणे नामे ||2||
तुकड्यादास म्हणे संतें केली कृपा ।
दावियला सोपा मार्ग आम्हां ||3||