अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत । जाहले संमत नामासाठी ॥
अठराही पुराणे श्रुतिशास्त्र-मत ।
जाहले संमत नामासाठी ॥
गोड नाम जपा अंतरी धरोनि ।
चुकेल धरणी काळाची त्या ॥
नाही आडकाठी जाया मोक्षपुरी ।
सायुज्यता घरी बसता येई ॥
तुकड्यादास म्हणे नाम जपा कारे ।
निर्मळ अंतरे करूनिया ।।