जगी सर्व भेटे न भेटे हे एक ।

जगी सर्व भेटे न भेटे हे एक । 
वैकंठ नायक स्वामी माझा ||धृ ||
भोगत्याग सर्व पावेल मैथुन । 
परि नारायण दुर्लभु हा ||1||
उल्लंघे पर्वत समुद्रादि सर्व । 
परि देवराव भेटी नेदी ||2||
तुकडयादास म्हणे जग वश होय ।
परि पंढरिराय प्राप्त नोहे ||3||