गर्जती पुराणे शुति शास्त्र वेद ।

गर्जती पुराणे शुति शास्त्र वेद ।  
स्मरावा गोविंद सर्वकाळ ||धृ ||
तयावीण शांति न मिळे या जीवा। 
प्रमाणांचा ठेवा हेचि सांगे ||1||
साधुसंत ऋषी अनुभवा देती । 
एकचि सांगती  भक्ति प्रेम ||2||
तुकड्यादास म्हणे भजा मनोभावे । 
तरीच पावावे सायुज्यता ||3||