सबाह्य अंतरी शुद्ध करा मन

सबाह्य अंतरी शुद्ध करा मन । 
देवाचे भजन करावया ||धृ ||
नाहीतरी पंथ संघ येती आड । 
भक्तिचे कवाड बंद राहे ||1||
देव भाविकांचा दीनपतीतांचा । 
बोध हा संतांचा भुलू नये ||2||
तुकड्यादास म्हणे कुत्सीत भावना । 
तेणे पंढरिराणा अंतरेल ||3||