आहे मी तो पंथहीन । नाही पंथाचेही ज्ञान

आहे मी तो पंथहीन । 
नाही पंथाचेही ज्ञान ||धृ ||
विद्याहीन माझी मती । 
होतो मूढांच्या संगती ||1||
गुराख्याचा संग केला । 
तुज गायिले विठ्ठला ! ||2||
तुकड्यादासा दास करा। 
आस पायी घ्या श्रीधरा ! ||3||