चातकासि नव्हे तळी समाधान

चातकासि नव्हे तळी समाधान ।
मेघ त्या कारण पाणी सोडी ||धृ ||
तेसे आम्हा द्यावे देणे नारायणे । 
काया वाचा मने शरण आम्ही ||1||
सुखावया नेत्र मागती दर्शन । 
कोठे तरी चिन्ह दाखवावे ||2||
तुकड्यादास म्हणे जरी आम्ही हीन । 
हीनासी पावन करी देव ||3||