चंचलावे मन माझा नोहे दोष

चंचलावे मन माझा नोहे दोष । 
कां न तू नेत्रास भेटी देशी ?  ||धृ ||
न भेटशी तरी पाहती ते सैरा । 
जाउनिया वारा घेती दुजा ||1||
दर्शने पावन करा है नयन ।
पुन्हा माझो मन स्थीर राहे ||2||
तुकड्यादास म्हणे तुम्ही तृप्त करा । 
न फिरे माघारा विषयसुखां ||3||