कोणाचिया मना राहे समाधान
कोणाचिया मना राहे समाधान
पाहिल्यावाचून प्रिय वस्तू ||धृ ||
जे जया आवड़े तेचि इच्छितो ।
तयावीण जातो काळ कष्टी ||1||
मग कां लावशी आम्हासी उशीर ।
पाहु दे सुंदर रूप देवा ! ||2||
तुकड्यादास म्हणे सावळा घनश्याम ।
भेटता विश्राम पावे आम्हा ||3||