सुंदर अरण्यी उदास काननी ।

सुंदर अरण्यी उदास काननी । 
कोठेतरी कोणी पाहिले का ? ॥
तीर्थ क्षेत्र धाम मंदीरीं आश्रमी । 
पाहिला कां प्रेमी कोणी माझा ? ॥
जो जगा चालवी सुत्र धरोनिया । 
उपजवी माया-यंत्राहाती ॥
तुकड्यादास म्हणे मी तो जीव जड़ । 
परवा हे कोड दाखवोनी ॥