वेडावली वृत्ति रंगली कीर्तनी ।

वेडावली वृत्ति रंगली कीर्तनी ।
तयासी तेथूनी लोटू नका ||धृ ||
टाकवू द्या पाय पुढे भाविकाचा । 
मार्ग हा तयाचा रोकू नका ||1||
घालू नका आड प्रारब्धाचा भोग । 
येऊ द्या संयोग दर्शनाचा ||2||
तुकड्यादास म्हणे या देवा ! बाहेरी । 
पाहू द्या गोजिरी मूर्ति डोळा ||3||