कोणाकडे पाहू व्हाया समाधान ? ।

कोणाकडे पाहू व्हाया समाधान ? ।
पुरवील आण कोण माझी ? ||धृ ||
तुजवीण कोण दिनाचा दयाळू ? । 
कृपाळू मायाळू नारायणा ! ||1||
जगाचा आराम, भक्तांचा विश्राम् । 
योगिया निजधाम तूचि एक ||2||
तुकडयादास म्हणे घ्यावी माझी भाक । 
करावे नि:शंक पायी आत ||3||