तुझे पाय साक्ष आहे नारायणा ! ।

तुझे पाय साक्ष आहे नारायणा ! । 
जरा भेटिविना शांति नाही ||धृ ||
पहावे कोणासी नव्हे समाधान । 
मायीक हे जन दुःख देती ||1||
कोठे तरी जावे वाट या देहासी । 
जीव हा परदेशी झाला देवा ||2||
तुकड्यादास म्हणे नको पाहू अंत । 
भेट दे त्वरित येवोनिया ||3||