उदास हे वाटे जग तुझ्यावीण
उदास हे वाटे जग तुझ्यावीण ।
कोठेही है मन शांत नौहे ||धृ ||
जहरा समान भासती विषय ।
क्षणही ने जाय कंठिल्या हा ||1||
मित्र गोत्र सर्व दिसती दुर्जन ।
एका नारायणेवीण सर्व ||2||
तुकड्यादास म्हणे भेट दे केशवा !।
नाहीतरी जिवा घात करी ||3||