गांजलियावरी काय तू गांजसी ? ।

गांजलियावरी काय तू गांजसी ? । 
आता पायापाशी घेई देवा ! ||धृ ||
झाला सत्यानास माइया संसाराचा । 
आतुनिया त्याचा वीट आला ||1||
निःसंगलो आम्ही झालो दिगंबर । 
पैशाने कंबर खाली झाली ||2||
तुकड्यादास म्हणे कैसा राहू जगी ? । 
मरणे तरी वेगी देई आता ||3||