कोण सांगे ज्ञान तुम्हावीण दीना
कोण सांगे ज्ञान तुम्हावीण दीना ।
आलो मी चरणा गुरुराया ! ||धृ ||
कोण अधिकारी आहे त्या गाविचा? । वोधआत्मयातचा कोणा ठावा ? ||1||
कोण प्रेमी वाटे सख्या विठ्ठलासी ?।
कोणाच्या हांकेसी देव धावे ? ||2||
तुकड्यादास म्हणे हा माझा विश्वास । संताचिये आस पुरवी देव ||3||