चला तुम्ही पुढे येतो मागे मागे
चला तुम्ही पुढे येतो मागे मागे ।
श्रृतिशास्त्रा संगे घेऊनिया ||धृ ||
तुमच्याचि वाटे टाकीन पाऊल ।
घेतचि चाहूल मागे येतो ||1||
कृपा-हस्त ठेवा बालकाच्या शिरी ।
मार्ग हा काटेरी साफ करा ||2||
तुकङ्यादास म्हणे सांगा देवापाशी ।
घ्याजी अनाथासी पायावरी ||3||