मार्ग चालतांना काटे गोटे लागे ।

 मार्ग चालतांना काटे गोटे लागे । 
अधिकाराजोंगे नाही आम्ही ||धृ ||
करावे भजन दंभ येतो आड । 
क्रोध लागे द्वाड पाठीमागे ||1||
क्रोधाचियेमिसे काम करी वैर । 
आहे परिवार दुर्जनांचा ||2||
तुकड्यादास म्हणे सांगा काय करू ? । 
न कळे हे गुरुवांचोनीया ||3||