जन्मासी येवोनी मरणे फुकाचे

जन्मासी येवोनी मरणे फुकाचे । 
हे तो शहाण्या चे काम नव्हे ||धृ ||
चमकोनी जावे पृथ्वीचिया पोटी । 
दहा करी गोष्टी सुकीर्तिच्या  ||1||
दाते तरी व्हावे , सेवक रहावे वे । 
कीर्तिने भरावे भूमंडळ ||2||
तुकड्यादास म्हणे आले श्वानावाणी । 
मेले तरी कोणी हाका नेदी ||3||