आता ऐसे करी आलिया संसारी ।

आता ऐसे करी आलिया संसारी । 
ऋणा नाश करी वासनेच्या ।।
मरणी हासणे मरणा पाहणे । 
साधून घे, जेणे साध्य होय ||1||
तुकड्यादास म्हणे परलोक-गमना । 
दु:ख वाटे  जना ऐसे करी ||2||