सुखदःख-भोग जगामाजी येसी । नर- तनु ऐसी योनी नाही ॥
सुखदःख-भोग जगामाजी येसी ।
नर- तनु ऐसी योनी नाही ॥
इतर त्या योनी मिळती बहुत ।
प्रपंच तयात न सुटेचि ॥
सुख दुःख सर्व बाहेरी भोगसी ।
अज्ञानी राहसी म्हणूनी गङ्या ! ।।
तुकडयादास म्हणे नर-जन्म ऐसा ।
तोडावया फासा चौ्यांशीचा ॥