सृष्टि-सौंदर्याचे पाहतांना खेळ ।

सृष्टि-सौंदर्याचे पाहतांना खेळ । 
मन  हे विव्हळ होय माझे ||धृ ||
नखशिखी बृक्षवल्लि शृंगारिली । 
कैसी कोणे केली तुझ्यावीण ? ||1||
तुझ़्या सृष्टिवरी मन जे मोहते । 
तुज पाहतां ते कैसे होई ? ||2||
तुकड्यादास म्हणे लाजो ही अहंता । 
तज भगवंता ! पाहो डोळे ||3||