देवा ! नका पाडू कोणाचिये मधी
देवा ! नका पाडू कोणाचिये मधी ।
सापडू द्या संधी माझी मज ||धृ ||
दर हे सारावे ढग अज्ञानाचे ।
तोडोनी मनाचे बंध सर्व ||1||
शुद्ध चिदाकाशी एकांत मंदीरी ।
गोड़ रूप हरी ! पाहू द्याहो ||2||
तुकड्यादास म्हणे सारा हा घुंगट ।
पाहू द्यावा नीट आत्मा माझा ||3||