केली आहे देवे कृपा । तरिच आलो मानवरूपा

केली आहे देवे कृपा । 
तरिच आलो मानवरूपा ||धृ ||
उपकार सांगो किती ? । 
मी तो दीन अल्पमती ||1||
घड़े भक्ति या देहाने । 
हे तो देवाचेचि देणे ||2||
तुकड्यादास सदा दीन । 
पुरवी आस नारायण ||3||