डोळे पाहो तुज पाहणे सारोनी
डोळे पाहो तुज पाहणे सारोनी ।
पाहता पाहणी तदाकार ||धृ ||
मग नये वृत्ति बृत्तिचिया घरा ।
भेटली माहेरा आपुलिया ||1||
सर्व सुखाचेही सुख ते लाधले ।
मन जे कां झाले उन्मनचि ||2||
तुकड्यादास म्हणे विषयाचे सुखा ।
ओवाळावे मुखा पाहता तुझ्या ||3||