कुणाचिया जोरे वाढलास जगी ।
कुणाचिया जोरे वाढलास जगी ।
आपुलीच पुंगी वाजवीसी ||धृ ||
कोणी दिले तुज गर्भवासी दूध ।
मळ मुत्र गंध सारोनिया ||1||
कोणी वाढविले आयुष्य सकळ ।
काळाचेहि काळ दूर केले ||2||
तुकड्यादास म्हणे स्मर त्या हरिसी
जेणे अहर्निशी सांभाळीले ||3||