जैसे खावे ल्यावे प्यावे । तैसे देवा आळवावे

जैसे खावे ल्यावे प्यावे । 
तैसे देवा आळवावे ||धृ ||
तेणे दिले पोटभर । 
नाही तरी कैचे घर ||1||
देव जया वरी कोपे । 
त्याची वाढतील पापे ||2||
तुकड्या म्हणे भजा देवा । 
तरीच पावे सुख-ठेवा ||3||