आपणासारिखे पहा सकळ जन । सांडा अभिमान नष्ट भ्रष्ट

आपणासारिखे पहा सकळ जन । 
सांडा अभिमान नष्ट भ्रष्ट ||धृ ||
जयाने का केला अहंकार मोठा । 
शेवटी त्या गोटा तोंडी आला ||1||
रावणे नाशिली लंका सोनियाची। 
अहंकारे त्याची गती केली ||2||
तुकड्यादास म्हणे बरे रहा जगी । 
कोणी उगी दगी करू नये ||3||